‘कशास आई भिजविशी डोळे उजळ तुझे भाळ रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उष:काल’
बोरगांव मंजु व परिसरातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे, समाजमन सुसंस्कारीत करण्याच्या प्रांजळ हेतूने मा.आ. गजाननरावजी दाळू (गुरूजी) साहेब यांनी 1993 मध्ये श्री संत गजानन महाराज महाविद्यालयाची स्थापना केली.
महाविद्यालयाचे ब्रीदवाक्यच ‘सुसंस्कृत विद्यार्थी घडवू या’ असे आहे. गेल्या तीस वर्षात महाविद्यालयाने संघर्षाचे अनेक चढउतार पार करीत आजपर्यंत वाटचाल केली आहे. प्रत्येक घटकाने आपआपल्या परीने हे महाविद्यालय समृध्द होण्यासाठी हातभार लावलेला आहे. सन्माननीय अध्यक्षांच्या मार्गदर्शनात आणि भक्कम पाठबळामुळे विकासक्रम गतीमान आहे. अत्यंत निष्ठेने आणि ममतेने ते याप्रक्रियेचे नेतृत्व करीत असल्यामुळे आज माझ्यासह महाविद्यालयाच्या सर्व घटकांमध्ये आत्मविश्वास आणि प्रचंड उत्साह जाणवतो. पन्नास विद्यार्थ्यांपासून सु डिग्री होणाया महाविद्यालयात आज जवळपास चारशे-पाचशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. हजारो विद्यार्थी पदवी शिक्षण पूर्ण करून गेले आणि विविध शासकीय व निमशासकीय संस्थांमध्ये, प्राधिकरणांमध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत. विशेष म्हणजे जिथे आहेत तिथे खुप चांगले कार्य करीत आहेत आणि अनेक समाजोपयोगी उपक्रमांमध्ये हिरिरीने सहभाग घेत आहेत. समाजाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करीत आहेत, याचा मला सार्थ अभिमान आहे.
विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी निर्माण व्हावी या जाणीवेने महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे पथक कार्यरत आहे. ग्राम स्वच्छता, अंधश्रध्दा निर्मूलन, रक्तदान शिबिर, नेत्रदान शिबिर, वृक्ष लागवड, वृक्षसंवर्धन, पाणी अडवा पाणी जिरवा, बंधारे बांधणे, समाज प्रबोधन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व, वादविवाद, काव्य स्पर्धा असे अनेक उपक्रम राबविले जातात. अनेक समाजोपयोगी उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचे मोलाचे योगदान आहे.
‘एकमेका साह्य क डिग्री अवघे ध डिग्री सुपंथ’ या उक्तीप्रमाणे सन्माननीय अध्यक्ष मा.श्री गजाननराव दाळू साहेब, मा. सचिव श्री ओमप्रकाशजी दाळू यांच्यासह सर्व सन्माननीय कार्यकारी मंडळ, महाविद्यालय विकास समितीचे सर्व सन्माननीय सदस्यगण, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, माझे लाडके विद्यार्थी, सन्माननीय पालकवर्ग, ज्यांचे विशेष सहकार्य लाभले असे सर्वच बोरगांव निवासी आणि आजुबाजुच्या परिसरातील सर्व सन्माननीय रहिवासी या सर्वांचे बहूमोल मार्गदर्शन, सहकार्य, शुभेच्छा सदिच्छा, प्रेरणांचे बळ पाठीशी असल्यामुळे मी आहे म्हणून सर्वांचे म:पूर्वक आभार, धन्यवाद।